जळगाव : सातपुड्यातील निंबादेवी धरणावर पर्यटकांना बंदी, पोलीस बंदोबस्त तैनात

जळगाव : सातपुड्यातील निंबादेवी धरणावर पर्यटकांना बंदी, पोलीस बंदोबस्त तैनात
Published on
Updated on

जळगाव : यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या व श्रीक्षेत्र मनुदेवी खालोखाल स्थान असलेले निंबादेवी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. दोन दिवसांपासून धरण ओसंडुन वाहु लागल्याने निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पाण्याचा प्रवाह लक्षात घेता, याठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने पर्यटकांवर बंदी घातली आहे. याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेले निंबादेवी धरण ओव्हरफ्लो होण्याच्या प्रतिक्षेत होते. मागील दोन तीन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात‌ या धरणावर पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. तेव्हापासून यावल तालुक्यातील निंबादेवी धरण हे जिल्ह्यात प्रसिद्ध झाले आहे. मोशी डॅमची अनुभुती पर्यटकांना या ठिकाणी गेल्यावर येते असे पर्यटकांचे म्हणणे आहे. सातपुडा पर्वतरांगेतून वाहणारे पाणी आणि नयनरम्य पर्वतास बघण्यासाठी सहलीच्या निमित्ताने बघणाऱ्या पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होत असते.

सातपुडा पर्वतरांगेतून येणारा पाण्याचा प्रवाह लक्षात घेता, काही अप्रीय घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने निंबादेवीचे पर्यटनस्थळी पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे, पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त लावण्यात आला आहे. सुरक्षेतेच्या दृष्टीने पर्यटकांनी या ठिकाणी येवु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news