कोल्‍हापूर : गारगोटी-वेंगरूळ मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्‍वार ठार | पुढारी

कोल्‍हापूर : गारगोटी-वेंगरूळ मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्‍वार ठार

कडगाव ; पुढारी वृत्तसेवा भुदरगड तालुक्यातील गारगोटी-वेंगरूळ मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्‍वाराला धडक दिली. या अपघातात तुंग ता.मिरज येथील सागर कांबळे हा मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला.

याबाबत घटनास्थळावरून प्रमदर्शनी समजलेली माहिती अशी की, सागर कांबळे हे अंदाजे (रविवार) रात्री 12 नंतर MH10 AZ 3932 डिस्कवर या मोटरसायकल वरून वेंगरूळकडे जात होते. यावेळी मडूर-शेळोली दरम्यान असणाऱ्या वाकड शेत जवळ त्यांच्या मोटरसायकला त्याच मार्गे जाणाऱ्या अज्ञात अवजड वाहनाची धडक बसली. यावेळी त्यांची मोटरसायकल बाजूला पडून ते अवजड वाहनाच्या पाठीमागील चाकात सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा असे दिसून येत आहे.

अपघातात रस्‍त्‍यावर पडलेल्या मोटरसायकलचे मात्र कोणतेच नुकसान झालेले दिसून येत नाही. ही घटना सकाळी निदर्शनास आली.सागर कांबळे यांच्या मागे वडील व दोन भाऊ आहेत. या अपघाताची नोंद शेळोलीचे पोलीस पाटील दत्तात्रय कांबळे यांनी भुदरगड पोलीस स्टेशनला केली असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर, पोलीस कॉन्स्टेबल एम डी मगदूम करत आहेत.

Back to top button