Saptshrungi Gad : 400 फूट खोल दरीत कोसळलेली बस अखेर काढली बाहेर | पुढारी

Saptshrungi Gad : 400 फूट खोल दरीत कोसळलेली बस अखेर काढली बाहेर

नाशिक : सप्तशृंगीगड वार्ताहर 

१२ जुलैला सप्तशृंगीगड (Saptshrungi Gad) घाटातील गणपती टप्प्यावरून तब्बल 400 फूट खोलदरीत बस कोसळली होती. या अपघातात एका महिलेचा मृत्यूही झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. ही बस दरीत तशीच अडकून पडली होती, ही बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर आज दरीत पडलेली ही बस बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

दोन ते तीन दिवसांपासून ही बस काढण्याचा प्रयत्न सुरु होता. पण बस चिखलात असल्याने काढण्यात अडचण निर्माण होऊन क्रेनचा रोप तुटुन जात होता. आज चार मोठ्या क्रेनच्या सहाय्याने ही बस बाहेर काढण्यात यश आले आहे. आज प्रशासनाकडून त्यासाठी घाटाचा रस्ता बंद करण्यात आला होता. भाविकांना गडावर न येण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. सकाळपासून बस बाहेर काढण्याचे काम सुरु होते. अखेर ही बस बाहेर काढण्यात आली असून उद्यापासून रस्ता सुरळीत चालु होणार आहे.  दरम्यान यापुढे अशी घटना घडु नये यासाठी घाटात सुचना फलक लावण्याची व संरक्षक भिंती बांधणे गरजेचे बनले आहे. (Saptshrungi Gad)

हेही वाचा : 

Back to top button