अजित पवार गट आणि शिंदे गटात जमीन आस्मानचा फरक : संजय राऊत | पुढारी

अजित पवार गट आणि शिंदे गटात जमीन आस्मानचा फरक : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : “अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाशी आम्ही सहमत नाही. त्यांचा निर्णय महाराष्ट्रच्या हिताचा नाही. अशा निर्णयामुळे राज्याचं नुकसानच होणार आहे. पण शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात जमीन आसमानचा फरक आहे,” अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे गटाचा विरोध डावलून वित्त खाते मिळवले. त्यांच्यासोबतच शरद पवारांची साथ सोडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनाही महत्त्वाची खाती मिळाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (दि.१५) आपल्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. दरम्यान, अजित पवार यांना अर्थखाते द्यायचे नसेल तर त्यांना मुख्यमंत्री पद द्या, असा प्रस्ताव शिंदे गटासमोर दिल्लीतून ठेवण्यात आला होता. असा दावा उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर अजित पवार यांनी मात्र ‘अफवांवर विश्वास ठेवू नका’ असे प्रत्युत्तर दिले आहे.

शिंदे गटाकडून ठेवला होता ‘असा’ प्रस्ताव

आज (दि.१५) माध्यमांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, “अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्यांचा अनुभव दांडगा आहे. शिंदे गटाच महत्व शिवसेना फोडण्या इतपतच होतं. हे लोक दिल्लीला गेले पण तिथे त्यांच कोणी काही ऐकल नाही. त्यांना राहायच असेल तर राहा नसेल तर जा, असं सांगितलं गेलं. दिल्लीला त्यांच्यापुढे असा प्रस्ताव ठेवला की, अजित पवार यांना अर्थखातं द्यायच नसेल तर त्यांना मुख्यमंत्री पद द्या आणि तुमच्याकडे अर्थखातं ठेवा; या प्रस्तावावर ते मागे आले. अशी खात्रीशीर माहिती मला मिळाली आहे,” असे राऊत यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button