

नगरसुल : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील नगरसुल येथील नारंदि नदी पुलावरून ईरटीका कार खाली कोसळून सातजण जखमी झाल्याची घटना दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान घडली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ईरटीका कार (MH17AV7022 )शिर्डी कडुन नांदगावला लग्न समारंभासाठी जात असताना वळण असल्याने चालकाला अंदाज न आल्याने कार थेट पुलावर खाली कोसळली. खाली खडक असल्याने गाडीतील प्रवाशांना जबर मार लागला.
यात, रंजना बालाजी वैद्य वय ४५, संगिता मिळू वैद्य वय ४३ , अश्विनी संतोष जाधव वय ३१, वैशाली अशोक बनकर वय ४३, मनिष दत्तू गायकवाड वय ४२, सुवर्णा रंगनाथ वैद्य वय ४३, माळू काळू वैद्य वय ४९ सर्व राहणारे शिर्डी तालुका राहता जिल्हा अहमदनगर यांना मार लागल्याने खाजगी रुग्णवाहिकेने नगरसुल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यातील दोन महीलांना जबर मार लागल्याने त्यांना शिर्डी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत.
वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय सपाटे, दिपक साळुंखे, सिस्टर मनिषा पाटील, सुरेखा यरोला, प्रियांका कांबळे, अनिता सोनवणे, प्रमोद सांगळे यांनी जखमींवर उपचार केले. वावगे अनिल निकम, गणेश बोरसे, अतुल येवले, मनोज पैठणकर, शुभम निकम, वैभव पैठणकर, मंगेश गरुड यांनी तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा :