नाशिक (सप्तशृंगीगड) प्रतिनिधी :
आदिवासी बांधवांच्या हक्काच्या आरक्षणावर गदा आणण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप करत आदिवासी बांधवांच्या आरक्षणा चे तुकडे पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्याला विरोधासाठी 15 जुलै रोजी नाशिक येथे राज्यस्तरीय मोर्चाचे आयोजन केले आहे. या एल्गार मोर्चाचे नेतृत्व विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ करणार असल्याचे बैठकीत ठरले आहे.
आदिवासींमध्ये इतर जमातींना आरक्षण दिले जाऊ नये अशी भूमिका आदिवासींनी घेतली आहेे. दिंडोरी रोडवरील नाथकृपा लाॅन्स येथे सर्व आदिवासी प्रतिनिधी व आदिवासी बांधव व विविध संघटना यांची बैठक झाली. यावेळेस आमदार मंजुळा गावीत (साक्री), राजेश पाडवी (निकोज), हिरामण खोसकर (इगतपुरी), सुनील भुसारा (जव्हार), दिलीप बोरसे (सटाणा) नितिन पवार (कळवण), राजेश पाटील (विक्रमगड), माजी मंञी पदमाकर वळवी, माजी आमदार निर्मला गावीत, शिवराम झोले, माजी खासदार हरिच्रद चव्हाण, माजी महापौर रंजना भानसी, नंदुरबार जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक सह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
धनगर आरक्षण संबधी हायकोर्टात 13 ते 14 तारखेला सुनावणी होणार असून त्यापार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही समाजांना आपली भुमिका कोर्टात मांडावी लागणार आहे. धनगरांना आदिवासींचे आरक्षण सोडुन कुठेही आरक्षण द्या अशी भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली आहे. त्यासाठी 15 जुलै ला आदिवासींनी एल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे.
प्रसंगी आदिवासी बचाव संघटनेनेचे राम चैरे, अशोक बागुल, के.के गागुर्डे, महादेव कोळी, कैलास शार्दुल, देवा वटाणे, रावण संघटनेचे विकी मुंजे, आदिवासी शक्ती संघटनेचे रोशन गांगुर्डे, अॅड दत्तु पाडवी, नगरसेवक योगेश शेवरे, शशिकांत मोरे, लकी जाधव, कौशल्या गवळी, चेतन खबाईत, सुरेश पवार तसेच साक्री, नंदुरबार, जव्हार, पुणे, धुळे, नाशिक येथील आदिवासी बाधव मोठया संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :