श्रीसाईबाबा पालखीचे रविवारी होणार प्रस्थान | पुढारी

श्रीसाईबाबा पालखीचे रविवारी होणार प्रस्थान

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी प्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त रविवार दि. 2 जुलै रोजी श्रीरामपूर ते शिर्डी मानाचा पहिला श्रीसाईबाबा पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार असल्याची माहिती संयोजक श्रीदक्षिण मुखी हनुमान मंदिर मंडळाचे संस्थापक- अध्यक्ष विलास लबडे, संजय खोसरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक बाबासाहेब खोसरे व अशोक बँकेचे माजी संचालक रणजित पाटील यांनी दिली. स्व. रामभाऊ सहादू पा. लबडे, स्व. जिजाबाई रामभाऊ लबडे व स्व. संजय कचरु पा. खोसरे यांच्या स्मरणार्थ पायी पालखीचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. पालखीचे यंदाचे 21 वे वर्षे आहे.

हरिश्चंद्र पावटे, शरदराव राजवळ, कर्डीले व कोळपकर यांच्या अधिपत्याखाली पालखी निघणार आहे. रविवारी सकाळी 6 वा. श्रीदक्षिण मुखी हनुमान मंदिर, बेलापूर रोड, वॉर्ड नं.7, लबडे वस्ती येथून पालखीचे प्रस्थान होणार आहे. पालखीचे पुजन अ‍ॅड. अरुण लबडे, अनंत निकम, राहुल कुंभकर्ण, नुप झरेकर, यश सोनी या साई भक्तांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी आ. लहू कानडे, माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, दिपाली ससाणे, श्रीसाई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, न. पा. मुख्याधिकारी गणेश शिंदे, भारती कांबळे, बाबासाहेब चिडे, प्रकाश अण्णा चिते, ज्ञानेश्वर मुरकुटे आदींसह श्रीसाईबाबांचे सेवेकरी व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

मुंबई : विलेपार्ले पूर्वेकडील कॅप्टन गोरे उड्डाणपुलाखाली कंटेनरचा अपघात

सातारा : निरा उजवा कालव्यात पडून एकाचा मृत्यू

अहमदनगर : विदेशी मद्यासह तिघांना पकडले; भिंगार पोलिसांची कारवाई

Back to top button