

धुळे; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला तीन वर्ष सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश श्रीमती यास्मिन देशमुख यांनी सुनावली आहे.
धुळे तालुक्यातील एका गावात १३ वर्षे वयाची पीडिता अंगणाबाहेर तिच्या आई समवेत झोपलेली असताना राहुल बाळू पाटील उर्फ राहुल अरुण पाटील या तरुणाने त्या अल्पवयीन मुलीस झोपेतून उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचा विनयभंग देखील केला ही बाब कोणाला सांगू नये यासाठी त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
मात्र घडला प्रकार पिडितेने तिच्या आई, वडील आणि नातेवाईक यांना सांगितल्यामुळे तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी प्रदीप मैराळे यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
या खटल्याचे कामकाज सत्र न्यायाधीश श्रीमती यास्मिन देशमुख यांच्यासमोर झाले. न्यायमूर्ती श्रीमती देशमुख यांनी आरोपीस पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीस तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
अधिक वाचा :