नाशिक : गाळेधारकांकडून एका महिन्यातच रेकॉर्ड ब्रेक वसुली

नाशिक : गाळेधारकांकडून एका महिन्यातच रेकॉर्ड ब्रेक वसुली
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

थकलेले गाळे भाडेवसुलीसाठी नेमलेल्या विशेष वसुली पथकाने महिनाभरातच रेकॉर्डब्रेक वसुली केल्याचे समोर आले आहे. ५७५ गाळेधारकांकडून तब्बल एक कोटी १२ लाखांचा भरणा करण्यात आला असून, नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक ७३ लाखांची गाळे भाडेवसुली करण्यात आली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची कामगिरी करण्यात आली असून, वसुली पथकाचा थकबाकीदारांनी घेतलेला धसकाही यानिमित्ताने बघावयास मिळत आहे.

आयुक्तांनी चालू आर्थिक वर्षात नाशिककरांवर करवाढ लादणे टाळत उत्पन्नासाठी वसुलीवर जादा जोर दिला. चालू आर्थिक वर्षात २०० कोटी मालमत्ताकर, ७५ कोटी पाणीपट्टी व ५० कोटी गाळे भाडेवसुलीचे टार्गेट दिले आहे. मनपाच्या गाळ्यांची भाडेवसुली तापदायक ठरत आहे. गेल्या वर्षीची ३६ कोटी व चालू वर्षातील १४ कोटी अशी एकूण ५० कोटींची वसुली करसंकलन विभागाला करावी लागणार आहे. सहाही विभागात १५ विशेष पथके वसुलीसाठी नियुक्त केले आहेत. त्यात ४८ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. मनपाचे सहाही विभाग मिळून ६२ व्यापारी संकुल असून, एकूण दोन हजार ४५७ गाळे व ३८३ ओटे आहेत. रेडिरेकनर दर लागू झाल्यापासून ते आतापर्यंत गाळेधारकांकडे एकूण ५० कोटी भाडे थकले आहेत. विशेष पथकातील कर्मचारी प्रत्येक थकबाकीदाराला भेट देत त्यांच्याकडून थकबाकी वसूल करत आहेत. शिवाय थकबाकीदारांना भाडे अदा करण्यासाठी पाच हप्त्यांची सवलत दिली जात आहे. हप्त्यांवर भरण्यास तयारी दर्शवल्यास त्याच्याकडून शंभर रुपयांचे हमीपत्र व पाच धनादेश आगाऊ घेतले जात आहेत. या विशेष पथकाने एक महिन्यात तब्बल एक कोटी १२ लाखांचे भाडे वसूल केले आहे. तसेच हप्त्यांमध्ये थकबाकी भरण्याची सुविधा देऊनही सहकार्य करत नसलेल्या गाळेधारकांना अंतिम नोटिसा बजावल्या जात आहे.

समान हप्त्यांची सवलत

जूनच्या पहिल्या आठवड्यात गाळेधारकांना देयके वाटल्यानंतर पाच समान हप्त्यात भरणा करण्याची सवलत उपलब्ध करून दिली होती. मात्र, यास अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम '८१ ब' प्रमाणे ३० दिवस मुदतीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. थकबाकीदारांनी सहकार्य करणे टाळल्यास थेट धडक मोहीम राबवत गाळे जप्त करण्याचे अधिकार विशेष पथकाला देण्यात आले आहे.

विभागनिय गाळे भाडेवसुली

सातपूर – ९ लाख ७ हजार

पंचवटी – ३ लाख ९५ हजार

नवीन नाशिक – १ लाख ५९ हजार

नाशिकरोड – १७ लाख ४२ हजार

नाशिक पश्चिम -७३ लाख ३ हजार

नाशिक पूर्व – ७ लाख ३४ हजार

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news