नाशिक : रेल्वेच्या तलावात मद्यपान ; दोघांना अटक
इगतपुरी (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
शहरात रेल्वे विभागाचा तलाव असुन या तलावाच्या मध्यभागी जाऊन मद्यपान करणाऱ्या दोन जणांना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धोकादायक अशा ठिकाणी दोन पर्यटक मद्यधुंद अवस्थेत रेल्वे तलावाच्या मधोमध गेले. त्यांनी तेथे जाऊन मद्य प्राशन करण्यास सुरूवात केली. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिकांनी याविषयी रेल्वे सुरक्षा दलाला कळवले. रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेत दोन्ही तरुणांना घटनास्थळी जाऊन अटक केली आहे.
रेल्वे तलाव परीसरात मद्यपान करणे धोकादायक ठरू शकते. यापुर्वी रेल्वे तलावात अनेक जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या ठिकाणी बेकायदा होणाऱ्या घटनांना आळा घालण्यास रेल्वे सुरक्षा दल सक्षम आहे. असे गैरकृत्य करताना दिसल्यास रेल्वे सुरक्षा दलाला कळवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक राकेश कुमार यांनी केले आहे.
हेही वाचा :