नाशिक : कथित पत्रकारावर खंडणीचा गुन्हा | पुढारी

नाशिक : कथित पत्रकारावर खंडणीचा गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्याची धमकी देत एका कथित पत्रकाराने शेतकऱ्याकडून ६० हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपतराव गंगाधर पाटील (६८, रा. जऊळके, ता. दिंडोरी) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित कल्पेश लचके (रा. मखमलाबाद नाका) याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे.

पाटील यांच्या फिर्यादीनुसार, संशयित कल्पेश याने ८ ते ९ जून दरम्यान, खंडणीची मागणी करून ६० हजार रुपये घेतले. पाटील यांनी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाबाबत तक्रार आली असून त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार आहे. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यासाठी कल्पेशने पाटील यांच्याकडे ८० हजार रुपयांची मागणी केली. त्या मोबदल्यात कल्पेशने पाटील यांच्याकडून ६० हजार रुपये घेतले. त्यानंतर पाटील यांनी पंचवटी पोलिसांकडे धाव घेत कल्पेशविरोधात खंडणीची फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा:

Back to top button