नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महानगरपालिका क्षेत्र वगळता उर्वरित जिल्ह्यासाठी इयत्ता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी जाहीर केले आहे. उर्वरित नाशिक जिल्ह्यासाठी अकरावी प्रवेश 14 जूनपासून ऑफलाइन पद्धतीने बेस्ट ऑफ फाइव्हच्या गुणवत्तेनुसार होणार आहेत.
अकरावी प्रवेशासाठी वैधानिक, सामाजिक आरक्षण असे…
अनुसूचित जाती 13 टक्के, अनुसूचित जमाती 7 टक्के, व्हीजे अ 3 टक्के, एनटी ब 2.5 टक्के, एनटी क 3.5 टक्के, एनटी ड 2 टक्के, विशेष मागासप्रवर्ग 2 टक्के, इतर मागास प्रवर्ग 19 टक्के, आर्थिक दुर्बल घटक 10 टक्के तसेच इनहाउस कोटा 10 टक्के, अल्पसंख्याक कोटा 50 टक्के, व्यवस्थापन कोटा 5 टक्के, पेसा क्षेत्र महिला, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, क्रीडा, समांतर आरक्षण यासाठी आरक्षणाच्या नियमानुसार प्रवेश देण्यात येतील.
मालेगाव शहर व तालुक्यातील 29 अनुदानित, 11 अंशत: अनुदानित, 32 विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित अशा 72 कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशाची माहिती नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सचिव अनिल महाजन यांनी दिली आहे.
एका तुकडीसाठी प्रवेश क्षमता
माध्यमिक शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालय – 80, वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालय – 120
यावर्षी बहुतांश शाळांचा निकाल 90 टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. तसेच विद्यार्थी जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने सर्वच शाखांसाठी कटऑफ वाढणार आहे. – अनिल महाजन, सचिव, नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना.
इयत्ता 11 वी प्रवेशाचे वेळापत्रक असे…
1. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज वितरीत करणे व जमा करणे. 14 ते 17 जून
2. अर्जाची छाननी, संवर्गनिहाय गुणवत्ता यादी तयार करणे. 19 ते 21 जून
3. पहिली संवर्गनिहाय गुणवत्तायादी व प्रतीक्षा यादी प्रदर्शित करणे. 21 जून (सायं. 4 पर्यंत)
4. पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. 22 ते 24 जून
5. रिक्त जागी दुसर्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे. 26 जून
6. रिक्त जागी दुसर्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. 27 जून
7. रिक्त जागी तिसर्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे. 28 जून (सायं. 4 पर्यंत)
8. रिक्त जागी तिसर्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. 30 जून
9. रिक्त जागी चौथ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे. 1 जुलै (सायं. 4 पर्यंत)
10. रिक्त जागी चौथ्या यादीतल विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 3 जुलै
11. शिल्लक जागेवर प्राप्त अर्जानुसार गुणानुक्रमे प्रवेश देणे. 4 ते 7 जुलै
शाखा कला वाणिज्य विज्ञान संयुक्त एकूण
मालेगाव ग्रामीण प्रवेश क्षमता 3040 320 1440 – 4800
मालेगाव शहर प्रवेश क्षमता 2560 720 2320 160 5760