नाशिक : संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन | पुढारी

नाशिक : संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

संजय राऊत यांनी केलेल्या कृती व वक्तव्याविरोधात कळवण तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी संजय राऊत यांचा फोटो असलेल्या बॅनरला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला. यावेळी राऊत यांच्याविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांच्या आदेशाने कळवण तालुका शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी तालुकाप्रमुख शरद पगार, शहर प्रमुख सागर जगताप, बबलू जगताप, पप्पू पवार, अमोल बोरसे, हेमंत बोरसे, प्रशांत निकम, सतीश पवार, मंगेश गांगुर्डे, नंदू पिंपळसे, रोहित खुडे, सागर केदारे, संदीप पवार, उमेश बोरसे, बापू पवार, मनोज चव्हाण, अजय चव्हाण, नंदुर पवार, विलास बसते, नागेश शेवाळे, बापू हिरे, नंदू पवार, किरण पगार, सचिन पाटील आदी आंदोलनात सहभागी होते.

हेही वाचा : 

Back to top button