पैठण : पेट्रोल व डिझेल चोरी करणारी टोळी जेरंबद | पुढारी

पैठण : पेट्रोल व डिझेल चोरी करणारी टोळी जेरंबद

पैठण; पुढारी वृत्तसेवा जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच्या पोलीस पेट्रोलिंग मोहीम अंतर्गत काल (शुक्रवार) रोजी इंधन चोरांवर पोलिसांनी कारवाई केली. पहाटे पैठण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे व पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष माने यांच्या पथकाने प्राणघातक शंस्त्रांसह डिझेल चोरी व पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सात जणांच्या टोळीला सापळा रचून जेरबंद केले. सदरील आरोपींकडून यापूर्वीच्या लुटमारीचा प्रकार उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीची पोलीस पेट्रोलिंग मोहीम अंतर्गत इंधन चोरांवर कारवाई करण्यात आली. पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार डिझेल चोरी व पेट्रोल पंप लुटण्यासाठी येत असल्याची गोपनीय खबर प्राप्त झाली. त्‍या आधारे पोलिसांनी पैठण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे, सपोनि संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, अमलदार घडे, किशोर शिंदे, अभिजीत सोनवणे, साबळे, डीवायएसपी पथकाचे जमादार सचिन भूमे, गणपत भवर यांनी बीड ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मुरमा फाट्यावर सापळा लावला. या ठिकाणी दोन ट्रक संशोस्पद थांबले असल्याचे आढळून आले.

सदरील ट्रकची झडती घेतली असता, यामध्ये तलवारीसह दरोडा टाकण्याचे साहित्य आढळून आले. या कारवाईच्या वेळेस ट्रकमध्ये लपून बसलेले आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी पाठलाग करून अशोक शहाजी शिंदे रा. खामकरवाडी जिल्हा वाशी जि. उस्मानाबाद, विजय शहाजी शिंदे रा. खामकरवाडी जिल्हा वाशी जि. उस्मानाबाद, दशरथ संदिपान शिंदे रा. दशमेगाव ता.वाशी जि. उस्मानाबाद, अशोक धर्मराज जाधव रा. मुंब्रा सेंट कळंब जि. उस्मानाबाद (चालक), रमेश महादेव जाधव रा. मुंब्रा ता. कळंब जि. उस्मानाबाद (चालक), धनाजी सुरेश शिंदे खामकरवाडी ता. वाशी जि. उस्मानाबाद, मधुकर उत्तमराव शिंदे रा. खामकरवाडी वाशी जि. उस्मानाबाद यांना पकडले.

त्यांच्याकडून दोन ट्रक व इतर दरोड्‍यासाठी लागणाऱ्या वस्तू असा 25,35850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाचोड पोलीस ठाण्यात संशयीत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये ही मोठी कारवाई झाल्यामुळे या आरोपींकडून इतर ठिकाणी केलेल्या लूटमार प्रकरणाचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे पुढील तपास सपोनि संतोष माने हे करीत आहे.

हेही वाचा : 

Back to top button