धुळे : सावरकर जयंतीदिनानिमित्त स्मारक दुरुस्तीसाठी शिवसेना महानगरचे भिक मांगो

धुळे : सावरका यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन झाल्यानंतर स्मारक दुरुस्तीसाठी निधी संकलन करताना शिवसेना महानगरप्रमुख धीरज पाटील, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री यांसह आदी. (छाया: यशवंत हरणे)
धुळे : सावरका यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन झाल्यानंतर स्मारक दुरुस्तीसाठी निधी संकलन करताना शिवसेना महानगरप्रमुख धीरज पाटील, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री यांसह आदी. (छाया: यशवंत हरणे)

धुळे : पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्रवीर सावरकरांच्या 140  व्या जयंतीनिमित्त शिवसेना महानगरच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सावरकर यांच्या स्मारक दुरूस्तीकरीता निधी संकलनसाठी भिक मांगो आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी नागरिक व धुळेकरांनी निधी संकलनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवसेनेच्यावतीने प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, महिला आघाडीच्या हेमा हेमाडे, सुषमा मराठे, नरेंद्र परदेशी, भरत मोरे, गुलाब माळी, देविदास लोणारी, ललित माळी, विनोद जगताप, संदिप सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

शिवसेनेचेसह संपर्कप्रमुख महेश मिस्त्री आणि जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी स्मारकाची माहिती देत महानगरपालिका प्रशासनावर टीका केली. शहरात 1983 साली स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य सभेच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक उभारण्यात आले. तत्कालिक विधान परिषदचे सभापती जयंतराव टिळक यांच्या हस्ते येथील स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र सध्यस्थितीत येथील स्मारकाची दयनीय अवस्था झाली असून त्याकडे धुळे महानगर पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. एकीकडे शहर विकासासाठी धुळे शहर स्मार्ट सिटीकडे वळताना कोट्यावधींचा निधी व आकडे वाढवून सांगीतले जात आहेत. तर नगरोत्थान योजनेंतर्गत कोट्यावधींचा निधी खर्च केला जात आहे. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या दुरूस्तीसाठी पंचवीस तीस लाखांचा निधी आजपर्यंत देखील उपलब्ध करून दिलेला नाही. या निषेधार्थ शिवसेना महानगरच्या वतीने पंधरा दिवसांपूर्वीच आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला प्रतिसाद देत शहराच्या आमदारांनी विस लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. परंतु स्मारक दुरूस्तीसाठी एक पैसाही विद्यमान प्रशासनाने दिलेला नाही. त्याचा निषेध म्हणून आंदोलन केले जात असल्याची भूमिका सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री आणि जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी मांडली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news