नाशिक : घोटी मर्चंट बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे वर्चस्व | पुढारी

नाशिक : घोटी मर्चंट बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे वर्चस्व

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
घोटी शहराची आर्थिक वाहिनी समजली जाणारी घोटी मर्चंट बँकेची निवडणूक बुधवार दि. २४ रोजी पार पडली. निवडणुकीच्या दिवशीच मतदान व मतमोजणी झाली. या निवडणुकीत पहिल्यांदाच नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली असून प्रगती पॅनलने आपले वर्चस्व ठेवले आहे. मतदारांनी देखील नवीन चेहऱ्यांना संधी देत प्रगती पॅनलला कौल दिला आहे.

दरम्यान, या चुरशीच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल याकडे सर्व घोटीकरांचे लक्ष लागून होते. १२ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये स्वर्गीय मुळचंद भाई गोठी प्रणित पॅनलच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला आहे. दरम्यान प्रगती पॅनलचे नेतृत्व माजी संघपती किसनलाल पिचा विद्यमान संघपती नंदलाल शिंगवी, चांदमल भंसाळी यांनी नेतृत्व केले. दरम्यान यापूर्वीच प्रगती पॅनलच्या ५ जागा आधीच बिनविरोध झाल्या असून १२ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते. घोटी मर्चंटसाठी ३ हजार ७८० मतदान होते. मात्र प्रत्यक्षात २४१७ मतदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीत प्रगती पॅनलच्या सोमनाथ काळे यांना १८०७, ईश्वर चोरडिया १८४७, दिपक चोरडिया १९३२, प्रशांत पिचा १९२६, विशाल पिचा १९१३, चांदमल भंन्साळी १८०१, ज्ञानेश्वर भोर १७३९, दिलिप लद्दड १९४६, सचिन लोढा १९२८, मयर वालझाडे १९१२, मुुुकेश शहा १७५४, उध्दव हांडे १७५९ मते मिळाली असून हे सर्व विजयी झाले आहेत.

तर रामदास शेलार, रविंद आहीरे गणेश ढाकणे निलम कुमठ मिनल पिचा हे यापुर्वी बिनविरोध झाले होते. तसेच रखमा कोकणे यांना ७४८ व मनोज चोपडा १२५२ मते मिळाले असुन त्यांचा पराजय झाला आहे. दरम्यान प्रगती पॅनलसाठी काळू भोर, नंदकुमार वालझाडे संतोष दगडे सागर वालझाडे दीपक साखला, चेतन वालझाडे, विपुल पिचा, निलेश भोर, युवराज टाकलकर, समाधान गोईकने, नंदु पिचा पारस चोरडीया विजय पिचा, आंबादास काळे, शरद हांडे विठ्ठल काळे भाऊसाहेब शेलार, प्रभू चव्हाण, प्रसाद सानप, विठ्ठल काळे, धीरज पिचा आदींनी प्रगती पॅनलसाठी परिश्रम घेतले. त्याच प्रमाणे घोटी मर्चंट बँकेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांचा आमदार हिरामण खोसकर यांनी सत्कार केला.

या निवडणुकीत घोटी मर्चंट बँकेच्या सभासदांनी आमच्यावर जो विश्वास दाखवून आम्हाला विजयी केले त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. या पुढे बँकेला कसा फायदा होईल यासाठी चांगले प्रकारे काम केले जाईल. – नंदलाल शिंगवी, प्रगती पॅनल.

हेही वाचा:

Back to top button