हिंगोली : जिल्हयात बारावीचा निकाल ८७ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी

हिंगोली : जिल्हयात बारावीचा निकाल ८७ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा निकाल 87 टक्के लागला असून या वर्षीही निकालामध्ये मुलीनींच बाजी मारली आहे. हिंगोली जिल्ह्यातून या परिक्षेसाठी 12965 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी 592 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

3464 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 5824 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 1505 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान या वर्षीही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातून 7353 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी 6106 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 83 टक्के आहे. यासोबतच 5612 पैकी 5084 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या असून त्यांची टक्केवारी 90 टक्के एवढी आहे. जिल्हाचा विज्ञान शाखेचा निकाल 93.06 टक्के, कला शाखेचा निकाल 78.27 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 95.73 टक्के तर किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचा निकाल 89.80 टक्के लागला आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी, मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.73 टक्के तर मुलांचा निकाल 89.14 टक्के लागला आहे. म्हणजेच मुलींचा निकाल मुलांपेक्षा 4.59 टक्के जास्त लागला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news