नाशिक : निराधार वृध्देला सरपंचानी दिला आधार | पुढारी

नाशिक : निराधार वृध्देला सरपंचानी दिला आधार

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
नागपूर येथील रहिवासी आसलेल्या ८२ वर्षाच्या महिला सोन्याबाई दखने या निराधार वृद्ध महिलेस सरपंंचानी स्वखर्चातून शौचालय बांधून दिल्याने सर्व ग्रामस्थांकडून योग्य व थेट सरपंच निवडून दिल्याचे समाधान व्यक्त होत आहे.

समाजात कोणताही आधार नसल्याने, वृध्दात्वामुळे व वाढत्या वयाच्या विविध कारणांमुळे या वृध्द मेहिलेला दैनंदीन विधी करायला बाहेर जाणे शक्य नव्हते. तसेच घरात वैयक्तिक शौचालय नसल्याने वृध्द आजीबाईचे हाल होत असल्याने येथील सरपंच राजाभाऊ पवार यांनी येथील महिला सदस्य पुष्पा पवार यांनी वृध्देची समस्येकडे लक्ष वेधले. त्यानंतर सरपंच पवार यांनी सरकारी मदतीची वाट न बघता त्वरीत चार महिन्यांच्या स्व पगारातून तसेच स्वखर्चातून वृध्द महिलेला शौचालय बांधून दिले.

नागापूर ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून नावाजलेली असून, या ग्रामपंचायतीस तेल कंपन्यांमुळे चांगले उत्पन्न मिळत असते. तर गेल्या वीस वर्षांपूर्वी याच ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून पवार यांनी कार्यभार स्विकारला होता. आता पुन्हा वीस वर्षानंतर राजाभाऊ पवार हे या ग्रामपंचायतीमध्ये थेट जनतेतून सरपंच निवडून आले आहेत. सरपंच पवार यांनी पूर्वी सरपंच असताना तेल कंपन्यांकडून मोठा कर ग्रामपंचायतीला मिळवून देण्याचे काम केले होते. सदैव सर्वसामान्यांच्या मदतीस पुढे असणाऱ्या सरपंच राजाभाऊ यांनी आज्जीबाई देखील अशाप्रकारे मदतीचा हात दिला आहे. यावेळी उपसरपंच केसर पवार, सदस्य पुष्पा पवार, सदस्य विद्या देवरे, सदस्य वाल्हा मोरे, रवीभाऊ नगे, निलेश पवार, रतनभाऊ खुरसने, प्रकाशभाऊ जिरे व ग्रामसेवक दिलीप निकम आदी उपस्थित होते.

जनतेने सरपंच म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेच्या समस्यांचे निरसन करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. मी लोकांचा सरपंच म्हणून नाहीतर एक जनतेचा सेवक म्हणून नेहमीच काम करत राहणार आहे. – राजाभाऊ पवार, सरपंच, नागापूर.

हेही वाचा:

Back to top button