Dhule politics : महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार? - पुढारी

Dhule politics : महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार?

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Dhule politics) 17 जागांसाठी आज दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गेल्यावेळी या बँकेवर काँग्रेस राष्ट्रवादीची सरशी झाली होती. पण आता मावळते चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांच्यासह आमदार अमरीशभाई पटेल यांनी भाजपमधे प्रवेश घेतल्याने आता महाविकास आघाडीचे डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आज धुळे व नंदुरबार जिल्हयातील दिग्गज नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात  मावळते चेअरमन राजवर्धन कदमबांडे, आमदार शिरीष नाईक , हर्षवर्धन दहीते, भाजपाचे सुरेश पाटील, प्रभाकर चव्हाण, तळोद्यातून भरत माळी, यांनी अर्ज केले आहेत.

गेल्या निवडणुकीच्याप्रसंगी आमदार अमरीषभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह नवापुरचे आमदार शिरीष नाईक हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या पॅनलमधे होते. त्यामुळे या बँकेवर याच पॅनलची सरशी झाली. पण आता धुळे व नंदुरबार जिल्हयातील राजकीय स्थिती बदलली आहे. मावळते चेअरमन राजवर्धन कदमबांडे तसेच आमदार अमरीशभाई पटेल यांच्यासह अनेकांनी भाजपाचा रस्ता धरला असल्याने ही निवडणुक बिनविरोध होण्याची मार्ग बंद झाले आहेत.

तथापी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील (Dhule politics) नेत्यांनी बैठक घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच्या हालचाली केल्या. यात भाजपाने लांबच रहाणे पसंत केले. त्यातच महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांमधे देखील एकमत होत नसल्याने आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी शेवटची मुदत असुन उमेदवारी माघारी घेण्यासाठी 8 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे बँकेच्या नवीन पॅनलचा निर्णय माघारी अंतीच ठरणार आहे.

हे वाचलंत का?

Back to top button