जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक : तीन उमेदवार बिनविरोध | पुढारी

जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक : तीन उमेदवार बिनविरोध

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक निवडणुकीत आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी  धरणगावातून संजय मुरलीधर पवार, तर पारोळा चिमणराव पाटील व  एरोडल मधून अमोल चिमणराव पाटील या तिघांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.अजून अर्ज छाननी व माघारी बाकी आहे त्यामुळे फक्त विजयाची घोषणा करणे बाकी राहिले आहे.

आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. तीन वाजेपर्यंत धरणगाव प्राथमिक सहकारी सोसायटी मतदारसंघातून फक्त संजय मुरलीधर पवार यांचाच अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. याबाबत नंतर अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. ते तिसऱ्यांदा बिनविरोध झाले आहे.

दरम्यान, याच प्रमाणे पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील तर एरंडोलमधून त्यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांची देखील बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. आमदार गिरीश महाजन यांनी आजच भाजपने सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा दावा केल्यानंतर एका तासातच महाविकास आघाडीचे तीन उमेदवार बिनविरोध झाल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

हेही वाचा :  कुणी कितीही चौकशा कराव्यात काहीही फरक पडणार नाही : खासदार सुप्रिया सुळे

दरम्यान, संजय पवार, अमोल पाटील आणि चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर जिल्हा बँकेत त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, संजय पवार, अमोल पाटील, विजय भास्कर पाटील, ज्ञानेश्‍वर महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

हेही वाचा : शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीकडून दुसऱ्यांना समन्स

Back to top button