Temperature : उष्णतेच्या तीव्र लाटांनी उत्तर महाराष्ट्र होरपळला | पुढारी

Temperature : उष्णतेच्या तीव्र लाटांनी उत्तर महाराष्ट्र होरपळला

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

गेल्या दोन दिवसांपासून होरपळत असलेला उत्तर महाराष्ट्र आज उष्णतेच्या तीव्र लाटांनी होरपळून निघाला. भूसावळला उच्चांकी ४४.९ अंश सेल्सियसची नोंद झाली. नाशिकचाही पारा ४० अंशापुढे सरकल्याने थंड हवेचे ठिकाण असलेले नाशिक अक्षरक्ष: भाजून निघाले.

गुरुवारी राज्यातील सर्वाधिक ४४.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद भुसावळला झाली आहे. तर जळगावात ४४.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. धुळ्यात ४३.६ अंश सेल्सियस इतकी नोंद झाली. जळगावात गुरुवारी यंदाच्या‎ उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.८‎ तापमानाची नोंद शहरातील केंद्रीय‎ जल आयोग कार्यालयात झाली.‎ गेल्या तीन दिवसांतच शहराचे‎ कमाल तापमान तब्बल ४.३ अंशांनी‎ वाढल्याचे या नोंदीतून समोर आले.‎

उत्तर-मध्य भारतातून येणाऱ्या उष्णलहरींमुळे नाशिकच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी (दि.११) कमाल तापमानाने पारा ४०.७ अंशांवर पोहोचला. यंदाच्या हंगामातील हे सर्वांत उच्चांकी तापमान ठरले असून, उन्हाच्या झळांनी नाशिककर अक्षरश: भाजून निघाले. पुढील २४ तास उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

मालेगाव शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही उन्हाची लाट कायम आहे. तीव्र झळांमुळे शेतीच्या कामांना फटका बसत आहे. तसेच ग्रामीण जनजीवनावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. दरम्यान, शुक्रवारपर्यंत (दि.१२) उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज आहे.

हेही वाचा :

Back to top button