जळगाव जिल्ह्याला मे हिटचा तडाखा, पारा ‘इतक्या’ अंशावर | पुढारी

जळगाव जिल्ह्याला मे हिटचा तडाखा, पारा 'इतक्या' अंशावर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानातदेखील बदल होत आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान वाढले असून, काल (दि.10) जळगावमध्ये पारा ४४.६ अंशांवर, तर भुसावळात ४४.८ अंशांवर गेल्याने सकाळपासून होणार्‍या उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले.

यंदाच्या उन्हाळ्यात मे महिन्यात दिवसेंदिवस परिसरात पारा उंचावत आहे. मागील दोन दिवसांत तापमानात कमालीची वाढ झाली आहे. जळगावमध्ये पारा ४४.६ अंशांवर पोहोचला, तर भुसावळात तापमान ४४.८ अंशांवर गेले आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून, जळगावमध्ये तापमान ४६ ते ४७ अंशांचा टप्पा गाठू शकते, असे हवामान तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली होती. आता गेल्या दोन दिवसांपासून सूर्य आग ओकू लागला आहे. उन्हाच्या कडाक्याने कहर केला असून, पारा उंचावत आहे.

पुढे महिनाभर उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. बुधवारी (दि.१०) जळगावात उच्चांकी ४४.६ अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली. सकाळी दहापासूनच उन्हाचे तीव्र चटके जाणविण्यास सुरुवात होते. कडक उन्हामुळे दुपारनंतर शहरात अनेक भागांतील रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र होते. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांनी डोक्यावर रूमाल, टोपी बांधल्याचे दिसून आले. उन्हापासून सुटका मिळण्यासाठी ताक, लस्सी, शीतपेय, उसाचा रस यांना प्रचंड मागणी वाढली आहे.

हेही वाचा :

Back to top button