कासारा दुमाला शिवारात चार ठिकाणी घरफोड्या | पुढारी

कासारा दुमाला शिवारात चार ठिकाणी घरफोड्या

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरात गजबजलेल्या भागांमध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमा कूळ घालत 3 ठिकाणी घरफोड्या करीत 3 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लांबविल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. संगमनेरातील घोडेकर मळ्यात राहणारे अर्जुन काठे हे मंगळवारी लग्ना साठी बाहेर गावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. कुलूप तोडून चोरट्यांनी काठे यांच्या तिजोरीतील सुमारे 30 हजार रुपयांच्या रोकडेसह 3 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, मुलीच्या बँक कलेक्शनचे सुमारे 20 हजार रुपये असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविला.

दुसर्‍या घटनेत कासारा दुमाला शिवारात शालिनी रुपवते यांचे ब्युटी पार्लरचे दुकाने फोडून चोरट्यांनी गल्ल्यातील सुमारे 10 हजार रुपयांच्या रोख रकमेसह मुलांच्या गळ्यातील सोन्याचे पदकं व दोन चांदीच्या पट्ट्या घेवून पोबारा केला. तिसर्‍या घटनेत चोरट्यांनी शिवाजी गुंजाळ यांच्या बंद घराचे कुलूप तोडून उचकापाचक केली, मात्र ते पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरातून किती ऐवज चोरीस गेला, हे समजले नाही. या घटनांबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Back to top button