Nashik Crime : अंबडला कंपनीत चोरी करणारे पाच सराईत जेरबंद, तीन फरारींचा शोध सुरू | पुढारी

Nashik Crime : अंबडला कंपनीत चोरी करणारे पाच सराईत जेरबंद, तीन फरारींचा शोध सुरू

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

चुंचाळे पोलिस चौकीच्या पोलिसांनी चार कंपन्यांमधील चोऱ्या उघडकीस आणून पाच संशयित गुन्हेगारांना जेरबंद केले. सुमारे पावणेचार लाख रुपयांचा चोरलेला ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली. यातील आणखी तीन फरारींचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर व पोलिस पथकाने चुंचाळे परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवताना मिळालेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये चोरी करणारे हे चुंचाळे घरकुल परिसरात राहात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सापळा रचत दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी संशयित आदित्य पांडे (२२), विशाल कुऱ्हाडे (२५), गुरुप्रीत देओल (२३), प्रकाश शिंदे (३२), प्रकाश वातुळे (३५) या पाच जणांना घरकुल योजना परिसरातून ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी या संशयितांकडून दीड लाखाच्या ३०० किलोंच्या लोखंडी प्रेस केलेल्या वस्तू, ६५ हजारांच्या स्टीलच्या चार प्लेट, सुमारे ३५ हजारांचे लोखंडी चॅनल, शटर, ५६ हजारांचे ७६ किलो वे स्टील, ३५ हजारांच्या लोखंडी प्लॅब डायप्लेट व चॅनल आणि 40 हजारांच्या दोन दुचाकी असा सुमारे पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

सर्व चोऱ्या शनिवारी
अंबड औद्योगिक वसाहतीत शनिवारी सुटीमुळे कंपन्या बंद असतात. याचा फायदा घेऊन हे संशयित कंपनीत शनिवारी रात्री चोरी करायचे. चोरटे पकडण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा वापर करत संशयितांचा माग काढला. यातील तीन फरारी चोरट्यांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button