नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
अजित पवार व संजय राऊत या महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळते आहे. दोघेही एकमेकांच्या आमनेसामने उभे ठाकले असताना व त्यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले असताना आता मात्र, संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याविषयी सावध पवित्रा घेतल्याचे दिसते. जळगावमध्ये बोलत असताना त्यांनी अंत्यत सावध प्रतिक्रिया अजित पवार यांच्याविषयी बोलताना दिली.
अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते गेल्या कित्येक वर्षापासून राजकारणात आहे. नशीब असेल तर अजित दादा सीएम होतील असे संजय राऊत म्हणाले. याचवेळी मी महाविकास आघाडीची वकीलकी करतो असा बचावही त्यांनी केला. त्याचवेळी, काही जण लायकी नसताना सीएम झालेत असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला.
उद्धव ठाकरे यांची उद्या जळगावच्या पाचोऱ्यात सभा होणार आहे. सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी संजय राऊत जळगावमध्ये आले आहेत. यावेळी पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. जळगावमध्ये येण्यासाठी आव्हान दिलं गेलं होत पण आम्ही जळगावात घूसलो आहे. जळगावातील शिवसेना जाग्यावर आहे, निवडणूकी दरम्यान ते दिसेल.
काहीजण लबाडी करुन सत्ता मिळवतात. कोणी कितीही चोऱ्यामाऱ्या केल्या, निवडणूक आयोगाने खोटी कागदपत्रे तयार करुन धनुष्यबाण जरी त्यांच्या हातात दिला असला तरी जळगावात मूळ शिवसेना जागेवर असून ती उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे. 2024 साली आम्ही परत सत्तेवर येऊ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :