कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : नाव ‘लक्ष्मी’, हातीही सोनियाचा वाळा | पुढारी

कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : नाव ‘लक्ष्मी’, हातीही सोनियाचा वाळा

मंगळूर : ‘नाव सोनुबाई, हाती कथिलाचा वाळा…’ ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. पण नाव लक्ष्मी, आणि संपत्तीही 1743 कोटींची असेल तर! तर हे असे घडले आहे आणि ही लक्ष्मी यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील सर्वांत श्रीमंत उमेदवार आहे.

84 किलो सोन्याचे दागिने, 16.44 कोटींचे हिरे असणार्‍या कल्याण राज्य प्रगती पक्षाच्या उमेदवार लक्ष्मी अरुणा या पती खाणसम्राट जनार्दन रेड्डी यांच्यापेक्षा श्रीमंत असून यंदाच्या निवडणुकीत त्या बळ्ळारी शहर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. खाण सम्राटाच्या पत्नी लक्ष्मी अरुणा यांनी उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात आपल्या या 1743 कोटींच्या संपत्तीचा तपशील नमूद केला आहे.

कोट्यवधींच्या शेतजमिनीसोबतच लक्ष्मी अरुणा यांच्याकडे 94 बिगरशेती भूखंड असून काही भूखंड भेट म्हणून दिल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. मात्र, खाण सम्राटच्या पत्नी असणार्‍या कुबेरकन्या लक्ष्मी अरुणा यांनी पती जनार्दन रेड्डी आणि मुलगा किरीट यांच्यासह आपल्याकडे कोणतीही वाहने नाहीत, असे नमूद केले आहे.

Back to top button