हिंगोली : एकीकडे आग ओकणारा सूर्य..,दुसरीकडे पोटात लागलेली भूकेची आग… | पुढारी

हिंगोली : एकीकडे आग ओकणारा सूर्य..,दुसरीकडे पोटात लागलेली भूकेची आग...

हिंगोली ; पुढारी वृत्‍तसेवा एप्रिल महिना मध्यावर आला आहे. सूर्य अक्षरशहा आग ओकतो आहे. अशा तीव्र उन्हात पोटातील भुकेची आग शमविण्याची धडपड कष्‍टकऱ्यांना कधी चुकत नाही. चार-दोन पैशांवर किडूक-मिडूक गोळा करून दिवस काढणाऱ्यांसाठी गरिबीच्या झळांसोबतच उन्हाचे चटकेही नित्‍याचेचं.

खेळणी विकून दोन पैसे येतील आणि पोटाची भूक भागवता येईल, याकरीता ग्राहकांची वाट बघणारा हा विक्रेता आखाडा बाळापूर येथे नांदेड-हिंगोली रस्त्याच्या कडेला खेळणी विकतो आहे. यामध्ये मान हलवणारी कुत्री, मांजरी आणि विविध आकर्षक बाहुल्‍यांचा समावेश आहे.

रस्‍त्‍यावरचे वाटसरू डोक्‍याला टॉवेल, टोप्या घालून चालत असताना, पोटातील भुकेच्या आगीपुढे, सूर्याच्या तप्त उन्हापासून बचावासाठी स्वतःच्या डोक्यावर टोपी घालावी हेच तो हा खेळणी विक्रता विसरलाय. त्याला सूर्य आग ओकतोय याची भ्रांतही राहिली नसावी असेच या फोटोकडे पाहून वाटते.

हेही वाचा : 

Back to top button