नाशिक : शेतकऱ्याच्या लेकीची वयाच्या एकोणविसाव्या वर्षी रेल्वे पोलिस दलात निवड

नाशिक : शेतकऱ्याच्या लेकीची वयाच्या एकोणविसाव्या वर्षी रेल्वे पोलिस दलात निवड

[web_stories title="false" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

महेश शिरोरे, खामखेडा (जि. नाशिक) :

खामखेडा येथील शेतकरी रविंद्र गंगाधर शेवाळे यांची कन्या अंकिता ही पोलिस भरतीचे सर्व निकष पूर्ण करत विविध अडथळ्यांच्या शर्यतीतून रेल्वे पोलिस दलात दाखल झाल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मागील वर्षी बारावी उत्तीर्ण झालेल्या अंकिताने प्रथम वर्ष कला शाखेसाठी बहिस्त प्रवेश घेत नाशिक येथील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात ऑगस्ट महिन्यात प्रवेश घेतला अन् सात महिन्यातच व वयाच्या एकोणवीसाव्या वर्षीच यशाला गवसणी घातली.

अंकिताने याआधी शालेय स्तरावर जलतरण स्पर्धेत घवघवीत यश मिळविले होते. पोलिस दलात जानेवारी महिन्यात तिने रेल्वे पोलीस भरतीसाठी मैदानी स्पर्धेत चांगले गुण मिळवत लेखी परीक्षेसाठी पात्र झाली होती. लेखी परीक्षा दिल्यानंतर नुकताच ११ एप्रिलला लेखी पेपरचा निकाल लागला. त्यात अंकिताने यश मिळवत रेल्वे पोलिसासाठी ती पात्र ठरली.

जिद्द चिकाटी मुळेच होऊ शकलं

अंकिता ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. तिचे आई रेखा व वडील रविंद्र शेतकरी आहेत. वडील अल्पशिक्षित असतांना देखील आजोबा गंगाधर शेवाळे व आजी सुनंदा यांनी खेड्यात शिक्षणाची गैरसोय होईल म्हणून लोणी प्रवरानगर येथे तिला पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षणासाठी प्रवेश घेतला. खेळात तसेच अभ्यासात चांगला रस असल्याने वयाच्या विसाव्या वर्षा आधीच आत अंकिताला मिळालेला या यशामुळे अंकिताच्या घरी आनंदाचे वातावरण आहे.

अंकिताची जिद्द व चिकाटी यामुळेच तीने हे यश मिळवले असल्याचे नाशिक येथील तीचे शिक्षक समीर काकड व तुषार कैचे यांनी सांगितले. खामखेडयातील या शेतकरी कन्येने मिळवलेल्या यशाबद्दल खामखेडा गाव तसेच नातलगाणमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आजी-आजोबा, आई यांच्या प्रोत्साहनाने माझी पोलिस होण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. भविष्यात मी नक्कीच इतर मुलींना पोलिस दलात येण्यासाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन करेल.
– अंकिता शेवाळे, खामखेडा.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news