

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
रिक्षाने जाणाऱ्या पती-पत्नीस मारहाण करीत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तसेच जवळ असलेली रोख रक्कम असा एकूण 75 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने जबरदस्तीने लांबविण्याचा प्रकार सिडकोतील सिंहस्थनगर भागात घडला आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र महादू गामणे (३६, रा. सिंहस्थनगर, सिडको) हे पत्नीसोबत रिक्षाने जात असताना सेंट लॉरेन्स शाळेजवळ २ चोरट्यांनी या त्यांना थांबवून मारहाण करीत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम असा एकूण ७५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित निखिल लाड व त्याचा मित्र सूरज शर्मा ( दोघांचे वय २४, दोघे रा. गणेश चौक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत खतेले व पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे करीत आहेत.
हेही वाचा :