पुणे : साखर, गूळ दरात आणखी वाढ; गोटा खोबरे उतरले | पुढारी

पुणे : साखर, गूळ दरात आणखी वाढ; गोटा खोबरे उतरले

पुणे : वाढती मागणी आणि अपुरा पुरवठा यामुळे मागील आठवड्यातही साखर आणि गुळाच्या दरात आणखी वाढ झाली. मात्र, मागणी कमी असल्यामुळे गोटा खोबरे दरात दहा किलोमागे आणखी शंभर रुपयांनी घसरण झाली. आवक-जावक साधारण असल्यामुळे अन्नधान्ये, नारळ, पोहे या वस्तूंचे दर स्थिर असल्याचे येथील गुलटेकडी मार्केट यार्ड तसेच नाना, भवानी पेठेतील घाऊक बाजारात फेरफटका मारला असता स्पष्ट झाले.

सणासुदीमुळे आणि शीतपेय उत्पादकांकडून दिवसेंदिवस साखरेस मागणी वाढत आहे. मात्र, चालू महिन्यासाठी जाहीर झालेला बावीस लाख टनांचा कोटा अपुरा असल्यामुळे साखरेचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यातही दरात आणखी 75 ते 100 रुपयांनी वाढ झाली आणि घाऊक बाजारात प्रतिक्विंटलच्या दराने 3 हजार 625 ते 3 हजार 675 ची पातळी गाठली. आगामी अक्षय तृतीया आणि रमजान महिना चालू असल्यामुळे साखरेस मागणी वाढत असल्याने दरवाढीस चालना मिळाली आहे. जादा कोटा खुला केला नाही तर हे दर आणखी कडाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा उसाच्या तुटवड्यामुळे साखरेचे उत्पादन कमी प्रमाणात झाले असून, यामुळे आगामी काळात दर तेजीतच राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आगामी अक्षयतृतीयेच्या सणाची खरेदी सुरू झाल्यामुळे घाऊक बाजारात गुळास मागणी वाढली आहे. आवक कमी प्रमाणात होत असल्यामुळे आधीच तेजीत असलेल्या गुळाचे दर गेल्या आठवड्यात क्विंटलमागे आणखी 100 रुपयांनी वाढले. गेल्या पंधरा दिवसांतच गुळाच्या दरात सुमारे 400 ते 500 रुपयांची वाढ झाल्याचे जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले.

अन्नधान्ये, डाळी स्थिर
मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्यानंतर मागणी कमी झाल्याने गेल्या आठवड्यात तुरडाळीचे दर स्थिरावले होते. मुगडाळ, मसूरडाळ, उडीदडाळीचे दरही टिकून होते. आवक-जावक साधारण असल्यामुळे गहू, ज्वारी, बाजरी, तांदळाच्या दरात कोणताही बदल आढळून आला नाही. मागणीअभावी आटा, रवा आणि मैद्याच्या दरात मात्र 50 किलोमागे 25 ते 30 रुपयांनी घट झाली. आवक मुबलक असून, मागणी कमी असल्यामुळे गोटा खोबरे दरात क्विंटलमागे आणखी 100 रुपयांनी घट झाली. साबूदाणा, शेंगदाणा, पोहे या जिनसांचे दर स्थिर होते. आवक कमी असून, मागणी वाढल्यामुळे भडंग दरात पोत्यामागे 75 रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल): 3625-3675 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर) : शेंगदाणा तेल 2800-2875, रिफाइंड तेल ः 2650-3400, सरकी तेल 1550-1850, सोयाबीन तेल 155-1850, पामतेल 1450-1650, सूर्यफूल रिफाइंड तेल 1675-1925, वनस्पती तूप 1450-1925, खोबरेल तेल 2250 रु.

तांदूळ : गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3300, सोनामसुरी 4000-4400, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509- 8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु.

गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3700-4000, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3400-3600, एम.पी. लोकवन नं.1 3600-3800, नं.2 3400-3600, सिहोर 4800-5500, सिहोरी 3400-3800, मिलबर 2350-2450 रु. ज्वारी : गावरान नं. 1- 5000-5500, गावरान नं. 2-4600-4900, नं. 3 4200-4500, दुरी 3500- 3900 रु. बाजरी : महिको 3200-3800, गावरान 3200-3500, हायब्रीड 3000-3200 रु.

गूळ : गूळ एक्स्ट्रा 4000-4100, गूळ नं. 1 3850-3950, गूळ नं. 2 3700-3800, गूळ नं.3 3550-3650, गूळ नं. 4 3400-3500, बॉक्स पॅकिंग 3600-5000 रु. डाळी : तूरडाळ 11000-12400, हरभराडाळ 6200-6300, मूगडाळ 9500-10700, मसूरडाळ 7400- 7500, मटकीडाळ 10000-11000, उडीदडाळ 9000-10700 रु.

कडधान्ये : हरभरा 5400-5500, हुलगा – 7100-7200 चवळी 7000-9000, मसूर 6600-6800, मूग 9000-9500, मटकी गावरान 9000-9200, मटकी पॉलिश 7500-8000, मटकी गुजरात 8000- 8200, मटकी राजस्थान 8000-8200, मटकी सेलम 11100-11500, वाटाणा हिरवा 5500-6000, वाटाणा पांढरा 5500-6000, काबुली चणा 9000-15000 रु. साबूदाणा : साबूदाणा नं.1 7000, साबूदाणा नं.2 6800, साबूदाणा नं. 3 6500 रु. वरई भगर :11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1100-1300 रु.

शेंगदाणा : जाडा 11700-12200, स्पॅनिश – 11600-11700, घुंगरू 10700, टीजे 10500 रु. धने : गावरान 8000-8500, इंदूर 9000-12000 रु. मका लाल :2475-2550, पिवळा लाल 2475-2550, पांढरा 3200-3300 रु. पोहे : मध्य प्रदेश 4000-4400, पेण 4000-4300, मध्यम पोहा – 3800-4300, दगडी पोहा 3800- 4400, पातळ पोहा 4400-5200, सुपर पोहा 4400-4700, भाजका पोहा 600-650, मका पोहा 625-675, भाजके डाळे 2800-3200, मुरमुरा (9 किलोस) 475-525, भडंग 750-850, घोटी 450- 475, सुरती 475-500 रु.

Back to top button