नाशिक : शेअर बाजाराच्या नावाने फसवणूक; ५२ लाखांची रक्कम घेऊन संशयित फरार | पुढारी

नाशिक : शेअर बाजाराच्या नावाने फसवणूक; ५२ लाखांची रक्कम घेऊन संशयित फरार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरासह उपनगरांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासह आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून सावज हेरणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचा संशय आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराच्या नावाने फसवणूक झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशोका मार्ग परिसरातील युवकालाही शेअर बाजाराच्या नावाखाली तब्बल ५२ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संताेष इंद्रभान गोरे (३५, रा. लक्झरिया अपार्टमेंट, अशोका मार्ग) यांना संशयित अविनाश सूर्यवंशी, वैभव ननावरे, साईनाथ त्रिपाठी, अमोल शेजवळ, शाहरूख देशमुख, जयेश वाणी, सिद्धार्थ मोकळ, आशुतोष सूर्यवंशी, इशा जयस्वाल, सचिन जयस्वाल, हितेश पवार यांनी शेअर बाजारामधून आकर्षक परताव्याचे आश्वासन दिले होते. या आमिषाला बळी पडत गोरे यांनी संशयितांकडे तब्बल ५२ लाख १० हजारांची गुंतवणूक केली होती. मात्र, संशयितांनी परतावा न देता कंपनी कार्यालय बंद केले.

संशयितांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गोरे यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी गोरे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक कोल्हे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button