

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात सलग तिसर्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत वाढ नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत कोरोनाचे 2994 नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील सक्रिय रुग्णसंख्या १६,३५४ वर पोहोचली आहे. शुक्रवारी देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे ३ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या १५,२०८ वर पोहोचली होती.
चीन आणि दुबईतून भारतात येणार्या प्रवाशांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशी सूचना टास्क फोर्सच्या वतीने करण्यात आली अली आहे.
देशात हृदयविकाराचा झटका (Heart attack) येऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये तरुणांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या चिंतेची बाब ठरली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थेने कोविडनंतर हृदयविकाराच्या घटनांबाबत अभ्यास सुरू केला आहे. यामध्ये कोविड आणि आणि हृदयविकाराचा झटका यांचा काही संबंध आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याबाबतचा अहवाल येत्या दोन महिन्यांत येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिली.
हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) झालेल्या मृत्यूबाबत आयसीएमआर सविस्तर संशोधन करून अहवाल लवकरच सादर करेल, त्यानंतर सरकार कृती आराखडा तयार करेल, असेही डॉ. मांडविया यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यात सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान अनेकांचा मृत्यू झाला आहे. या विषयावर आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांसोबत तीन बैठका झाल्या आहेत. आणि त्याचे कारण काय आहे. हे शोधण्यासाठी संशोधन सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा :