नंदुरबारच्या साखर कारखान्यात आयकर विभागाची झडती सुरुच

100 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड
100 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड
Published on
Updated on

आयकर विभागाची झडती :

 तालुक्यातील समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड साखर कारखान्यात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून काल सुरू झालेली तपासणी आज सलग दुसऱ्या दिवशी देखील चालूच आहे. तथापि कोणते कागदपत्र ताब्यात घेण्यात आले? संचालकांकडून कसली माहिती घेण्यात आली? तसेच पथकाच्याा हाती काय लागले? यापैकी कशाचीही माहिती बाहेर पडणार नाही, याची दक्षता पथकाकडून घेतली जात आहे.

दीडशे कोटी रुपयांच्या मालमत्ते प्रमाणेच साखर कारखान्याच्या माध्यमातून चाललेले आर्थिक व्यवहार तपासणीसाठी विशेष केंद्रीय पथक आले असल्याचे म्हटले जात आहे. परंतु कारखान्याच्या आवारात कोणालाही प्रवेश दिला जात नसल्यामुळे प्रत्यक्षात कोण आलेले आहेत. आणि काय तपासणी चालू आहे. याची खात्री कोणालाही करता आलेली नाही.

समशेरपूर येथे 1996 मध्ये मोहनभाई चौधरी यांनी पुष्प दंतेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. कर्ज प्रकरणामुळे शिखर बँकेने त्याचा ताबा घेतला होता. कालांतराने तो अवसायनात काढून नंतर त्याची विक्री करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित ऑस्टेरिया शुगर कंपनीने हा कारखाना खरेदी केला होता. 150 कोटी रुपयांची मालमत्ता असताना अवघ्या 47 कोटी रुपयात विक्री झाल्याची त्यावेळी ओरड झाली होती.

कंपनीनेही बँकेतून मोठे कर्ज घेतले होते.

या कंपनीनेही बँकेतून मोठे कर्ज घेतले होते. व सचिन शिंगारे यांना विकला होता. दरम्यान, कारखान्याचे नामकरण पुन्हा करण्यात आले व आयन मल्टीट्रेड कंपनीच्या हेड खाली साखर कारखाना आणि त्याचे व्यवहार चालू ठेवण्यात आले. या कंपनीचे मालक शिंगारे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. तथापि छापेमारी करणारे पथक आयकर विभागाची झडती सुरु आहे की ईडी संचालनालयाचे आहे, याचा अधिकृत खुलासा झालेला नाही.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news