विद्यार्थिनीची छेड काढणारा NCB चा अधिकारी अटकेत | पुढारी

विद्यार्थिनीची छेड काढणारा NCB चा अधिकारी अटकेत

परळी; पुढारी वृत्तसेवा

हैदराबाद-हडपसर रेल्वेने प्रवास करणार्‍या एका विद्यार्थिनीची छेड काढल्याची घटना उदगीर-लातूर रोड दरम्यान गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून एनसीबीच्या मुंबई येथील अधिकारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे. दिनेश अंकुश चव्हाण असे त्या अधिकार्‍याचे नाव आहे.

गुरुवारी रात्री हैदराबाद- हडपसर या रेल्वेने एनसीबीमध्ये अधिकारी असलेले दिनेश चव्हाण हे प्रवास करत होते. उदगीर – लातूर रोडच्या दरम्यान त्यांनी एक विद्यार्थिनीची छेड काढली. यानंतर विद्यार्थिनीने रेल्वे पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे.

त्यावरून आरोपी चव्हाण यास परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार लातूर रोड दरम्यान घडला. अटक करण्यात आलेल्या चव्हाण यांच्या विरोधात परळी येथील जीआरपी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 354, 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button