नाशिक : गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी, भाव कमी झाल्याचा आनंद | पुढारी

नाशिक : गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी, भाव कमी झाल्याचा आनंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गुरुपुष्यामृत योग हा मुहूर्त सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्यात श्रीराम नवमी असल्याने ग्राहकांनी दुहेरी योग साधत सोने-चांदी खरेदीचा मुहूर्त साधला. गेल्या काही दिवसांपूर्वी विक्रमी दर गाठलेले सोन्याचे दर काहीसे कमी झाल्याचा ग्राहकांमध्ये आनंद दिसून आला.

गुढीपाडव्यानिमित्त सराफ बाजारात मोठी उलाढाल झाली असली तरी दरवाढीचा काहीसा परिणाम झाल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर सोन्याचे दर किंचितसे कमी झाल्याने, खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. ज्योतिषशास्त्रानुसार २७ नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानले जाते. पुष्य हा सर्व दृष्टांचा नाशक आहे. लग्नाशिवाय इतर कोणतेही काम सुरू करायचे असेल तर पुष्य नक्षत्र सर्वोत्तम मुहूर्तांपैकी एक आहे. नेमका हाच विचार करून अनेकांनी या मुहूर्ताचा योग साधत खरेदीला प्राधान्य दिले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीत गुंतवणूक करण्याचा ट्रेंड वाढत असल्यानेदेखील मुहूर्तावर खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. विशेषत: तरुणाईकडून गुंतवणुकीसाठी सोने-चांदीला प्राधान्य दिले जात आहे.

मुहूर्तावरील दर

२४ कॅरेट – ५९ हजार ७०० – प्रति १० ग्रॅम

२२ कॅरेट – ५४ हजार ७३० – प्रति १० ग्रॅम

चांदी – १ किलो- ७३ हजार

हेही वाचा : 

Back to top button