पुण्याच्या हडपसरमधील वाढती गुन्हेगारी चिंताजनक | पुढारी

पुण्याच्या हडपसरमधील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हडपसरमधील गुन्हेगारी टोळ्यांतील सुप्त संघर्ष पुन्हा डोके वर काढू पाहतोय. मर्डरला मर्डर रिप्लाय देणार, असे म्हणत सराईत गुन्हेगारांनी खुनाच्या गुन्ह्यात बाहेर आलेल्या आरोपीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. दुसरीकडे खून, खुनाचे प्रयत्न, वाहनचोरी, घरफोड्यांच्या गुन्ह्यांची वाढती संख्या चिंताजनक आहे. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करीत अनेक सराइतांना कारागृहाची हवा खायला पाठविले असले, तरी नव्याने निर्माण होणारे गुंड मात्र डोक्याला ताप ठरत आहेत. हडपसर येथील गुंडांना ससून हे बदला घेण्याचे ठिकाण ठरत असल्याचे दोन घटनांवरून समोर आले आहे.

येरवडा कारागृहातून उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका आरोपीवर थेट रुग्णालयातच गोळीबार करण्यात आला तसेच गुन्हा दाखल केल्यानंतर उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींनी रुग्णालयातच कोयत्याने फ—ीस्टाईल हाणामारी केली.

घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांनी नागरिक त्रस्त आहेत. पोटाला चिमटा काढून जमा केलेली पुंजी व फायनान्स कंपनीचे कर्ज काढून घेतलेली वाहने चोरटे पळवत आहेत. अवैध धंदे आणि त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. हडपसर पोलिस ठाण्यावरील वाढता ताण पाहता नवीन पोलिस ठाण्याची घोषणा करण्यात आली. प्रस्तावाचे कागदी घोडेसुद्धा नाचविले गेले. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे पोलिसांना देखील काम करताना कसरत करावी लागत आहे.

पाहा आकडे काय म्हणतात…
गुन्ह्याचा प्रकार 2022 2023
खून 15 01
खुनाचा प्रयत्न 24 03
चेन स्नॅचिंग 14 05
घरफोडी 85 15
वाहन चोरी 330 79

 

Back to top button