अल्पवयीन मुलीवर बारामतीत अत्याचार, जळगावात दिला बालकास जन्म

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : एका १६ अल्पवयीन वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. यात या मुलीने गर्भवती होऊन बालकास जन्म दिला आहे. रावेर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली असून, तरुणीवर व जन्मलेल्या बालकावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका जणावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील एका गावात अंदाजे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तिचे आईवडील हे शेतामध्ये ऊसतोडणीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. साधारण सात महिन्यांपुर्वी अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह बारामती तालुक्यातील फलटण जवळ ऊस तोडणीला गेली. तिथे झोपडी करून वास्तव्याला होते.
बारामती येथे अत्याचार
पीडित मुलगी ही घरी झोपडीत एकटी असताना आरज्या (पुर्ण नाव माहिती नाही) याने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. मुलीने घरात घाबरून कुणाला काहीही सांगितले नाही. त्यानंतर कुटुंबिय पुन्हा मुळ गावी रावेर येथे परत आले. त्यानंतर मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले. तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पीडित मुलीने मुलाला जन्म दिला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा :
- Coronal Holes On Sun’s Surface : सूर्यावर पडले पृथ्वीहून मोठे भगदाड; जाणून घ्या आपल्यावर काय होणार परिणाम
- Supreme Court : पालघर येथील साधूंच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीला सुप्रीम कोर्टाची हरकत नाही
- IPL 2023 : पंजाब किंग्जला झटका, लिव्हिंगस्टोन बाहेर!