नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत काळविटाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत काळविटाचा मृत्यू

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
येथील मिठसागरे – वावी रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने काळविटाचा जागीच मृत्यू झाला आहे.
सरपंच संदीप राजेभोसले यांना फोनद्वारे माहिती मिळाल्यावर राजेभोसले यांनी पशुधन खासगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश देव्हाड यांना उपचारासाठी बोलाविण्यात आले. मात्र उपचाराआधीच हे काळवीट मृत झाल्याचे देव्हाड यांनी घोषित केले. त्यानंतर पत्रकार संतोष भोपी यांनी वनाधिकारी अनिल साळवे यांना याबाबत माहिती दिली. वनकर्मचारी नारायण वैद्य यांनी वावी येथे येऊन मृत काळवीट ताब्यात घेतले. मृत काळवीट नांदूर येथील वनपरीक्षेत्र विभागात जमा करून त्याचे शवविच्छेदन सिन्नर येथील पशुधन अधिकारी यांनी केले. वनरक्षक आकाश रुपवते, वनमजूर नारायण वैद्य, जगन जाधव, संतोष मेंगाळ यांच्या उपस्थित अग्निडाग देण्यात आला.

हेही वाचा:

Back to top button