रहू, कतला, बांगडा, कोळंबीकडे कल | पुढारी

रहू, कतला, बांगडा, कोळंबीकडे कल

पुणे : खोल समुद्रातील मासळीचे दर आवाक्याबाहेर असल्याने खवय्यांनी रहू व कतला या नदीच्या मासळीकडे मोर्चा वळविला आहे. नदीतील मासळीची आवक जावक कायम असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर टिकून आहेत. खोल समुद्रासह खाडीतून बांगडा व कोळंबीची आवक वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने त्याच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. सध्या बाजारात रहू, कतला, बांगडा व कोळंबीच्या खरेदीकडे नागरीकांचा कल असल्याचे चित्र आहे.

नवरात्रींचे उपवास सुरू झाल्याने बाजारात मटण, मासळी, चिकन व अंडीला मागणी घटली आहे. एरवीच्या तुलनेत मागणीत 25 ते 30 टक्क्यांनी घसरण झाली आहे. खोल समुद्रासह खाडीतील मासळीचे गेल्या आठवड्यातील तेजीतील दर टिकून असल्याचे सांगण्यात आले. मागणी अभावी इंग्लिश अंडीच्या भावात शेकड्यामागे दहा रुपयांची घसरण झाली. तर, उर्वरित मटण, चिकन व गावरान अंडीचे भाव स्थिर राहिले आहेत. सध्या बाजारात मटण, मासळी, चिकनला मागणी कमी असून रामनवमीपर्यंत ही परिस्थिती कायम राहिल, अशी माहिती व्यापार्यांनी दिली. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 26) खोल समुद्रातील मासळीची 10 ते 15 टन, खाडी 200 ते 300 किलो, तर नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) – पापलेट : कापरी : 1600-1800, मोठे : 1500-1600, मध्यम : 1200-1300, लहान : 950-1000, भिला : 600-700, हलवा : 650-750, सुरमई : 650-700, रावस : 600-700, घोळ : 800, करली : 320-360, करंदी (सोललेली) : 400-440, भिंग : 320-360, पाला : 1000-1200, वाम : काळी 280-320 पिवळी 700-800, ओले बोंबील : 280-320. कोळंबी : लहान 280-360, मोठी : 400-600, जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स : 750, लॉबस्टर : 1800-2000, मोरी : 360-400, मांदेली : 100-140, राणीमासा : 200-240, खेकडे : 250-300, चिंबोर्या : 550-600. खाडीची मासळी : सौंदाळे : 240-280, खापी : 240-280, नगली : 360-400, तांबोशी : 480-550, पालू : 280-320, लेपा : 200-240, बांगडा : लहान 100 मोठा 140-160, शेवटे : 200-240, पेडवी : 100-120, बेळुंजी : 140-160, खुबे : 100-120, तिसर्या : 240-280 तारली : 140-160. नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 160-200, मरळ : 400-440, शिवडा : 200-240, खवली : 240-280, आम्ळी : 120-160, खेकडे : 400-440, वाम : 550-600. मटण : 700, चिकन : 200, लेगपीस : 250, जिवंत कोंबडी : 140, बोनलेस : 300. अंडी : गावरान (शेकडा) 920, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 480, डझन 72, प्रतिनग 6.

Back to top button