नाशिक : सिटीलिंककडून दिव्यांग मोफत कार्ड नूतनीकरणाला मुदतवाढ | पुढारी

नाशिक : सिटीलिंककडून दिव्यांग मोफत कार्ड नूतनीकरणाला मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
2022-23 मध्ये काढलेल्या दिव्यांग मोफत कार्डला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असून, दि. 31 मार्चऐवजी आता दि. 31 मे नंतर दिव्यांग मोफत कार्डचे नूतनीकरण करता येणार आहे.

नाशिक महापालिका हद्दीत राहणार्या दिव्यांग प्रवाशांना मोफत प्रवास करता यावा, यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि.तर्फे मोफत दिव्यांग कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर 2022 पासून दिव्यांग प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार 31 मार्च 2023 पर्यंत मोफत कार्डचा वापर दिव्यांग प्रवासी करू शकत होते. व 31 मार्चनंतर प्रवाशांना मोफत कार्डचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. मात्र, आता दिव्यांग प्रवाशांना आणखी दोन महिने मोफत कार्डचे नूतनीकरण करण्याची गरज नाही. कारण दिव्यांग मोफत कार्डची मुदत दोन महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. त्यानुसार आता मोफत कार्डधारक दिव्यांग प्रवासी 31 मेपर्यंत सद्यस्थितीत त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कार्डचा वापर प्रवासासाठी करू शकतात. दिव्यांग मोफत कार्डची मुदत दि. 31 मे 2023 पर्यंत वाढविण्यात आल्याने दिव्यांग प्रवाशांनी कार्ड नूतनीकरणासाठी पास केंद्रावर गर्दी करू नये. तसेच कार्डसंदर्भातील अद्ययावत माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात येईल. याची सर्व दिव्यांग प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सिटीलिंक शहर बसमार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button