Nashik Crime : कुमावतनगरला तरुणीचा विनयभंग | पुढारी

Nashik Crime : कुमावतनगरला तरुणीचा विनयभंग

नाशिक : कुमावतनगर परिसरात संशयित आकाश राजू परदेशी (रा. कर्णनगर, पेठरोड) याने तरुणीचा विनयभंग केला. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताने मंगळवारी (दि.२१) रात्री नऊ वाजता विनयभंग केला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारची काच फोडून किंमती ऐवज लंपास

नाशिक : कारची काच फोडून चोरट्याने कारमधील महागडा ऐवज लंपास केल्याची घटना तिडके कॉलनीत घडली. विवेक श्रीधर हरणे (४०, रा. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने कारची काच फोडून कारमधील लॅपटॉप, मोबाइल, हेडफोन, स्मार्टवाॅच, पॉवर बँक असा ८४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

यात्रेच्या गर्दीत दागिने लंपास

नाशिक : सातपूर येथे बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रमावेळी गर्दीतून चोरट्याने पूजा राजू बिटकर (रा. त्र्यंबकरोड, सातपूर) यांच्या गळ्यातील २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी पुजा यांनी सातपूर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

धारदार शस्त्राचा धाक दाखवून दमदाटी

नाशिक : धारदार शस्त्र बाळगून एकाने महिलेस जीवे मारण्याची धमकी दिली. अजय चंदर कुंदे (रा. मुंजोबा चौक, गणेशवाडी) असे या संशयिताचे नाव आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार, संशयित अजय याने बुधवारी (दि.२२) सायंकाळी ७.३० च्या सुमारास महिलेस शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button