Nashik Crime : कोयता नाचविणाऱ्या गुंडांना न्यायालयीन कोठडी | पुढारी

Nashik Crime : कोयता नाचविणाऱ्या गुंडांना न्यायालयीन कोठडी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

दत्त चौक भागात हातात कोयते घेऊन परिसरात शिवीगाळ करीत दहशत माजविण्याचा प्रकार करणारे बादल शेवरे व बाबू मेहंदळे यांना बुधवारी (दि. २२) न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रविवार, दि. १९ मार्च रोजी सिडकोतील दत्त चौक परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ रात्री चार ते पाच टवाळखोरांनी परिसरातून पायी चालत जोरदार शिवीगाळ केली होती. यातील एक ते दोन गुंडांच्या हातात धारदार कोयते होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने कारवाईची मागणी केली होती.

मंगळवारी संशयित आरोपी बादल शेवरे व बाबू मेहंदळे या दोन्ही आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेतले. दहशत माजविणाऱ्या टवाळखोरांची दत्त चौक परिसरात धिंड काढण्यात आली. दोघांना बुधवारी न्यायालयात उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अंबड पोलिसांनी तत्परता दाखवून कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

Back to top button