बँकॉक : पती-पत्नीच्या नात्यात कोणत्या कारणाने वितुष्ट निर्माण होईल, हे सांगता येत नाही. आता हे थायलंडमधील उदाहरणच बघा, एका महिलेने लॉटरी लागल्यानंतर आपल्या पतीच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर हलका करण्याऐवजी गुपचूप दुसऱ्याच व्यक्तीशी संसार थाटला. हा प्रकार निदर्शनास आलेल्या तिच्या पहिल्या पतीने तिच्याविरुद्ध खटलाच दाखल केला आहे.
नरीन नामक व्यक्तीने वीस वर्षांपूर्वी चवीवानशी विवाह केला होता. त्यांना तीन मुलेही आहेत. संसाराचा गाडा हाकताना नरीनच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने २०१४ मध्ये दक्षिण कोरियात नोकरीचा निर्णय घेतला. कालांतराने त्याची पत्नी पुन्हा थायलंडला परतली.
नरीन काही रक्कम कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पाठवीत असे. एकेदिवशी चवीवानला १२ मिलियन बाटची (जवळपास ३ कोटी रुपये) लॉटरी लागली. ही बाब तिने नरीनपासून अनेक दिवस लपवून ठेवली. अखेर हे समजल्यानंतर नरीन थायलंडला परतला. जे घडले होते, ते पाहून त्याच्या पायाखालची वाळू सरकली. त्याच्या पत्नीने फेब्रुवारीत एका पोलिस अधिकाऱ्याशी गुपचूप विवाह केला होता. वीस वर्षांच्या संसारानंतर आपल्यासोबत असे काही घडेल, याची कल्पना नसलेल्या नरीनने याबाबत थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
हेही वाचा