जळगाव :केळी पिकावर फवारणीदरम्यान औषध डोळ्यात गेल्याने महिलेचा मृत्यू

जळगाव :केळी पिकावर फवारणीदरम्यान औषध डोळ्यात गेल्याने महिलेचा मृत्यू
Published on: 
Updated on: 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

केळी पिकावर फवारणी करताना विषारी औषध डोळ्यात व अंगावर पडल्याने जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील महिलेला विषबाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

जिजाबाई विश्वनाथ सोनवणे (५५, रा.नंदगाव, जि.जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. नंदगाव येथे जिजाबाई सोनवणे या शेती काम करून उदरनिर्वाह करीत होत्या. त्या शिवारातील शेतात केळीच्या पिकावर विषारी अळीनाशक औषधांची फवारणी करत असताना फवारणीचे औषध त्यांच्या डोळ्यात व अंगावर पडल्याने त्यांना विषबाधा झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.  पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news