चर्‍होलीत जुन्या भांडणाच्या रागातून फूलविक्रेत्यावर गोळीबार | पुढारी

चर्‍होलीत जुन्या भांडणाच्या रागातून फूलविक्रेत्यावर गोळीबार

पिंपरी : जुन्या भांडणाच्या रागातून पाठलाग करत एका फूलविक्रेत्यावर गोळीबार करण्यात आला. ही घटना शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चर्‍होलीतील चोवीसावाडी येथील बीआरटी काटे कॉलनी बसस्टॉपजवळ घडली. याप्रकरणी सिद्धेश सीताराम गोवेकर (वय 28, रा. वडमुखवाडी, चर्‍होली) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी हरिओम पांचाळ (वय 20, रा. आळंदी देवाची, ता. खेड) याच्यासह त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे फूलविक्रेते असून, शनिवारी रात्री ते दुचाकीवरून वडमुखवाडी येथील घरी जात होते. तेव्हा बीआरटी काटे कॉलनी बसस्टॉपजवळ जुन्या भांडणाच्या कारणातून आरोपी हरिओम आणि त्याच्या साथीदाराने दुचाकीवरून फिर्यादीचा पाठलाग केला. हरिओमने त्याच्या जवळची बंदूक फिर्यादीच्या दिशेने रोखून दोन गोळ्या झाडल्या. मात्र, आरोपीचा नेम चुकल्याने फिर्यादीचा जीव वाचला.

Back to top button