नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, अवैध मद्य जप्त | पुढारी

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, अवैध मद्य जप्त

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग व दिंडोरी भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत पिंपळगाव टोलनाका येथे अवैध मद्यासाठा घेऊन जाणारा आयशर जप्त केला आहे. यामध्ये ३१,४२,८४० रुपये किंमतीचा मुद्देमालासह वाहनचालकास अटक केली आहे.

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कळवण विभाग यांना मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई. डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त नाशिक अर्जुन ओहोळ, अधीक्षक नाशिक श. वि. गर्ने, उपअधीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभागाच्या पथकाने गुरुवार, दि. १६ रोजी नाशिक- पिंपळगांव मार्गावर पिंपळगांव टोलनाका, पिंपळगांव (ब) ता. निफाड येथे दारुबंदी गुन्हयाकामी सापळा रचला. यामध्ये वाहनतपासणी करतांना त्यांना एक तपकिरी रंगाची आयशर कंपनीचे प्रो. १९१०XP मॉडल सहाचाकी मालवाहतूक (क्रं. एम.एच.०४. एच.डी. १३१७) वाहनामध्ये प्लॅस्टिक यारन कॅपच्या गोण्याचे कवरिंग करुन त्याखाली मद्याची अवैधरित्या वाहतूक करताना आढळले. परराज्यातील विदेशीमद्यसाठा जप्त करण्यात आला. वाहनासोबत वाहनचालक रविशंकर सुखराम पाल यास अटक करण्यात आली आहे. या कारवाईत रॉयल स्पेशल प्रिमीयम व्हिस्कीच्या १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण ८८८० सिलबंद बाटल्या. (१८५ बॉक्स, दमण राज्यात निर्मात असुन दादरा नगर हवेली व दमण राज्यात विक्री करीता), डिएसपी ब्लॅक डिलक्स व्हिस्कांच्या १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण २०१६ सिलबंद बाटल्या. (४२ बॉक्स, दमण राज्यात निर्मीत असून दादरा नगर हवेली व दमण राज्यात विक्री करीता ), दुबर्ग स्ट्रॉग प्रिमीयम बिअर ५०० मि.ली. क्षमतेचे एकुण १९२० टिन (८० बॉक्स, महाराष्ट्र राज्यात निर्मीत असुन दादरा नगर हवेली & दमण राज्यात विक्री करीता ) हायवडंस ५००० सुपर स्ट्रॉंग बिअर ५०० मि.ली. क्षमतेचे एकुण ९६० टिन (४० बॉक्स, महाराष्ट्र राज्यात निर्मात असुन दादरा नगर हवेली & दमण राज्यात विक्री करीता) बिरावुम सुपर स्ट्रॉंग बिअर ५०० मि.ली. क्षमतेचे एकूण ७२० टिन (३० बॉक्स, महाराष्ट्र राज्यात निर्मित असून दादरा नगर हवेली व दमण राज्यात विक्री करीता )  प्लॅस्टिकचे यारन कॅपच्या गोण्या एक ओपो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल व एक समसंग कंपनीचा साधा मोबाईल असा एकुण ३१,४२,८४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  या गुन्हयातील संशयीत आंतराज्य मद्यतस्कारांचा शोध घेणे सुरु असून निरीक्षक . एस. के. सहस्त्रबुध्दे, दुय्यम निरीक्षक एम. बी. सोनार, आर. एम. डमरे, एस. व्ही. देशमुख, जवान सर्वश्री. दिपक आव्हाड, विलास कुवर, एम.सी. सातपुते, पी.एम. वाईकर, सचिन पोरजे, गणेश शेवगे, सोमनाथ भांगरे, दिपक नेमणार, आण्णा बहिरम, गणेश वाघ यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा:

Back to top button