NZ vs SL 2nd Test : कॉनवेचे अर्धशतक, किवींची सावध सुरुवात | पुढारी

NZ vs SL 2nd Test : कॉनवेचे अर्धशतक, किवींची सावध सुरुवात

पुढारी ऑनलाईन डेस्क : NZ vs SL 2nd Test : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दुस-या कसोटीला सुरुवात झाली असून पहिला दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे केवळ 48 षटकांचा झाला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 2 गडी गमावून 155 धावा केल्या आहेत. केन विल्यमसन 26 आणि हेन्री निकोल्स 18 धावांवर नाबाद आहे.

कॉनवेची शानदार फलंदाजी

किवींचा सलामीवीर कॉनवेने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात शानदार फकंदाजीचे प्रदर्शन केले. पहिली विकेट झटपट पडल्यानंतर त्याने संघाचा डाव सांभाळला. आपल्या संयमी खेळीत कॉनवेने 13 चौकारांच्या मदतीने 78 धावा फटकावल्या. त्याची बॅट यंदा लयीत असून गेल्या 5 कसोटीत कॉनवेने 41.66 च्या सरासरीने 375 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत. (NZ vs SL 2nd Test)

श्रीलंकेची गोलंदाजी कशी झाली?

कसून रजिथा आणि धनंजय डी सिल्वा यांनी 1-1 विकेट घेतली. रजिताने 2 मेडन्ससह 16 षटके टाकली. यादरम्यान त्याने 42 धावा दिल्या. तर धनंजयने 3 मेडन्ससह 8 षटके फेकली. त्याने 18 धावा दिल्या. लाहिरू कुमारा, असिता फर्नांडो यांना अद्याप एकही विकेट मिळालेली नाही. पाऊस आणि खराब प्रकाशामुळे सामना पूर्ण करणे कठीण झाले. दिवसभरात केवळ 48 षटकांचाच खेळ झाला. (NZ vs SL 2nd Test)

कॉनवेच्या नावावर विक्रमाची नोंद

या वर्षी कसोटीत धावा करण्याच्या बाबतीत कॉनवे चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी 5 कसोटी सामन्यात 375 धावा केल्या आहेत. कॉनवेने 2021 पासून न्यूझीलंडसाठी सर्वाधिक 50+ धावा केल्या आहेत. त्याच्या बरोबरीत डॅरिल मिशेल आहे. दोघांनी 12-12 वेळा 50+ धावा फटकावल्या आहेत. कॉनवेने 16 कसोटी सामने खेळले असून 29 डावांमध्ये 50.11 च्या प्रभावी सरासरीने 1,403 धावा केल्या आहेत.

Back to top button