ठाणे: टोकावडे येथील दीडशे एकरातील वनसंपदा जळून खाक | पुढारी

ठाणे: टोकावडे येथील दीडशे एकरातील वनसंपदा जळून खाक

मुरबाड; पुढारी वृत्तसेवा : मुरबाड तालुक्यातील टोकावडे वन विभागाच्या हद्दीतील खेडले, प-हे, पाडाले, ठुणे परिसरातील गायरानातील सुमारे दीडशे एकर जागेतील वनसंपदा वनवा लागल्याने जळून खाक झाली. यामध्ये लाखो रुपये खर्च करून लागवड केलेली झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

वृक्ष लागवड करण्यासाठी कोटींचा निधी खर्च होतो. त्यापैकी काही निधी झाडांच्या संरक्षणासाठी वापरण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी केली आहे. कर्मचारी व अधिकारी यांनी शिल्लक राहिलेल्या वनसंपदाचे वेळीच संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी मुरबाडे यांनी केली आहे.

दरम्यान, मुरबाड तालुक्यातील गेली दहा ते पंधरा वर्षापासून विविध ठिकाणी वणवा लागून हजारो एकर जमिनीवरील वनसंपदा जळून नष्ट होत आहे. वन्य जीवांचा होरपळून मृत्यू होत आहे. यास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच वनवे रोखण्यासाठी वनखात्याने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्ग व वनप्रेमींतून होत आहे.

हेही वाचा 

Back to top button