नाशिक : सिटीलिंक शहर बसेसमध्ये महिलांना सवलत नाही | पुढारी

नाशिक : सिटीलिंक शहर बसेसमध्ये महिलांना सवलत नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाने सर्व प्रकारच्या बसेससाठी महिलांना शुक्रवार (दि.१७) पासून ५० टक्के सवलत लागू केली आहे. परंतु, या सवलतीचा लाभ शहरी भागातील बसेससाठी नसल्याने नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक शहर बसतर्फे महिलांना सवलत लागू करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मनपाशी संलग्न असलेल्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाची सिटीलिंक शहर बससेवा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. सिटीलिंकच्या आजमितीस २०० सीएनजी आणि ५० डिझेलवर चालणाऱ्या बसेस सुरू आहेत. सिटीलिंकने गेल्या दोन वर्षांच्या काळात नागरिक तसेच विद्यार्थ्यांना पासेसमध्ये सवलत दिली आहे. तसेच शहरातील दिव्यांगांनादेखील प्रवासात सवलत दिली जात आहे. ग्रामीण भागातील दिव्यांग नाशिक शहरात आल्यास त्यासदेखील सिटीलिंकमार्फत सवलतीचा फायदा घेता येईल, अशी व्यवस्था सिटीलिंकने केली आहे. परंतु, आता राज्य शासनाने केलेल्या घोषणेनुसार बससेवेतील ५० टक्के सवलतीचा फायदा केवळ महामंडळाच्या बसेसद्वारेच दिला जाणार असून, त्यातून शहरी बसेसना वगळण्यात आले आहे. यामुळे महापालिकेच्या बसेसमधून प्रवास करण्यासाठी महिलांना सवलत मिळणार नाही.

हेही वाचा:

Back to top button