Share Market Closing | शेअर बाजारात खरेदीचा जोर पुन्हा वाढला, IT, बँकिंग स्टॉक्स तेजीत, जाणून घ्या मार्केटमधील घडामोडी

Share Market Closing | शेअर बाजारात खरेदीचा जोर पुन्हा वाढला, IT, बँकिंग स्टॉक्स तेजीत, जाणून घ्या मार्केटमधील घडामोडी
Published on
Updated on

Share Market Closing : जागतिक बँकिंग प्रणालीला आर्थिक पाठबळ देण्याच्या अनेक उपायांनी आर्थिक क्षेत्रातील संकटाची तीव्रता कमी झाली. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या. परिणामी जागतिक बाजारात तेजी आली. या तेजीचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारातही आज शुक्रवारी (दि.१७) तेजी राहिली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४०० हून अधिक वाढून ५८ हजारांवर गेला. तर निफ्टी १७,१०० वर होता. दरम्यान, दुपारच्या सत्रात दोन्ही निर्देशांकांनी काही वेळ स्थिर पातळीवर येऊन व्यवहार केला. त्यानंतर पुन्हा दोन्ही निर्देशांक वधारले. सेन्सेक्स ३५५ अंकांनी वाढून ५७,९८९ वर बंद झाला. तर निफ्टी ११४ अंकांनी वाढून १७,१०० वर स्थिरावला.

हे शेअर्स वधारले, हे घसरले

बँकिंग, फायनान्सियल आणि आयटी स्टॉक्स आज तेजीत राहिले. निफ्टी मेटल १.२५ टक्क्यांनी आणि आयटी २ टक्क्यांनी वाढला. ऑटो, फार्मा, रियल्टी, कन्झूंमर ड्यूरेबल्स, ऑईल आणि गॅस हेदेखील आज वधारले. निफ्टीवर एचसीएल टेक्नॉलॉजीस, इन्फोसिस, नेस्ले एलटी हे शेअर्स टॉप गेनर्स होते. तर आयटीसी, आयशर मोटर्स, बीपीसीएल आणि हिरो मोटोकॉर्प हे शेअर्स घसरले. अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, एचडीएफसी आणि विप्रो हेदेखील वाढले. दरम्यान, भारतीय एअरटेल आणि सन फार्मा हे घसरले. TCS चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राजेश गोपीनाथन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याचे शेअर्स किरकोळ घसरले.

दुपारच्या सत्रात अदानी ग्रीन एनजी (५ टक्के वाढ), अदानी ट्रान्समिशन (४.६५ टक्के वाढ), एचसीएल टेक्नॉलॉजीस (३.५३ टक्के वाढ) हे शेअर्स वधारले होते. आयटीमध्ये इन्फोसिसचा शेअर २.१९ टक्क्यांनी वाढला. तर एचसीएल टेक ४ टक्क्यांनी वधारला. तर आयटीसी २ टक्क्यांनी घसरला.

PSU bank स्टॉक्स ३ टक्क्यांपर्यंत वाढले

PSU bank स्टॉक्स आज ३ टक्क्यांपर्यंत वाढले होते. यात बँक ऑफ इंडिया (२.५९ टक्के वाढ),बँक ऑफ इंडिया (१.७५ टक्के वाढ), युनियन बँक ऑफ इंडिया (१.५५ टक्के वाढ), इंडियन ओव्हरसीज बँक (१.५२ टक्के वाढ), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (१.४४ टक्के वाढ), इंडियन बँक (१.३६ टक्के वाढ), युको बँक (१.२० टक्के वाढ), आयडीबीआय बँक (३.२७ टक्के वाढ), कॅनरा बँक (१ टक्के वाढ) यांचा समावेश आहे.

बँकिंग क्षेत्राला दिलासा, अमेरिका आशियाई बाजार तेजीत

अमेरिकेतील बँकिंग क्षेत्र संकटात आहे. अमेरिकेतील खाजगी बँकांच्या संघाने अडचणीत असलेल्या फर्स्ट रिपब्लिक बँकेसाठी ३० अब्ज डॉलरचे रिलीफ पॅकेज जाहीर केले आहे. यामुळे अमेरिकेतील बँकिंग क्षेत्राला दिलासा मिळाला. जागतिक संस्थांकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांचा मागोवा घेत आज जगभरातील बाजारात तेजी दिसून आली. अमेरिकेतील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज १.१७ टक्क्यांनी वाढून ३२,२४६ वर पोहोचला. तर एस अँड पी ५०० १.७६ टक्के वाढून ३,९६० वर पोहोचला. नॅस्डॅक कंपोझिट २.४८ टक्के वधारून ११,७१७ वर बंद झाला. आशियाई बाजारातही शेअसही आज वाढले. चीनचा शांघाय कंपोझिट १.५८ टक्के आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १.८४ टक्क्यांने वाढला. तर जपानचा निक्केई ०.८१ टक्क्यांनी वाढला. (Share Market Closing)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news